Breakingजुन्नरमध्ये पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ ; तालुक्यात सापडले ४७ कोरोना रुग्ण


जुन्नर : जुन्नरमध्ये आज (१६ मार्च) पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यात आज ४७ कोरोनाचे रुग्ण सापडले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला.


यामध्ये हिवरे तर्फे नारायणगाव ७, नारायणगाव ७, सितेवाडी ५, वारूळवाडी ४, येडगाव ४, खामुंडी २, नळावणे २, बेल्हे २, वडज १, पिंपळगाव तर्फे ना.गाव १, आळे १, बांगरवाडी १, हिवरे बु. १, खोडद १, हिवरे खु १, काळवाडी १, शिरोली बु.१, गोळेगाव १, जुन्नर नगर पालिका ४ समावेश आहे.


तर मागील २४ तासात २ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामध्ये कोळवाडी येथील ७८ आणि ८० वर्षीय दोन स्रियांचा समावेश आहे.


तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ६ हजार ६४० झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ११४ तर आता पर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २६२ असून सध्या तालुक्यात २६४ ऍक्टिव कोरोना रुग्ण आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा