Breakingफ्रान्सची राजधानी पॅरिससह 16 शहरांमध्ये एक महिन्याचा लॉकडाउन


युरोपीय देशांमध्ये एस्ट्राजेनेका लसीचा पुन्हा वापर सुरू


फ्रान्स : फ्रान्समध्ये कोरोनाची तिसरा लाट आली आहे. यामुळे आता राजधानी पॅरिसमध्ये एका महिन्याचा लॉकडाउन लावण्यात आला आहे. पॅरिससह इतर 15 शहरांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून एक महिन्याचा लॉकडाउन असेल. फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स म्हणाले की, हा लॉकडाउन आधिप्रमाणे कडक नसेल. फ्रान्समध्ये मागील 24 तासात 35,000 नवीन संक्रमित आढळले आहेत.


तिकडे, यूरोपियन मेडिसिन एजेंसी (EMA)च्या क्लीनचिटनंतर यूरोपियन देश लवकरच एस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचा वापर पुन्हा सुरू करणार आहेत. यूरोपियन देशांनी म्हटले की, स्पेन, पुर्तगाल, नीदरलंड, जर्मनी, इटली, फ्रान्स, लात्विया, लिथुआनिया आणि साइप्रससह अनेक देशात लवरच या लसीचा वापर सुरू केला जाईल. तर, आयरलंड आणि स्वीडनमध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल.


फ्रान्समध्ये तिसरी लाट


फ्रान्समध्ये कोरोनाचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक नवीन-नवीन व्हेरिएंटसह फ्रांसमध्ये महामारीची तिसरी लाट आली आहे. देशतील 16 राज्यांमध्ये कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाउनच्या काळातही आवश्यक वस्तुंची विक्री सुरू ठेवली जाईल. याशिवाय, नर्सरी, एलिमेंट्री आणि हायस्कूलदेखील सुरू राहतील. या लॉकडाउनच्या काळात लोक घराबाहेर पडू शकतील. पण, त्या सर्वांना कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा