Breakingजुन्नर : सरकारने घालून दिलेले कोव्हिडचे 'हे' नियम पाळण्याचे प्रशासनाचे आवाहन ; अन्यथा होऊ शकतो इतका दंड


जुन्नर : राज्यात आणि जुन्नर तालुक्यात देखील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. अनेक गोष्टींवर निर्बंध घातले असताना देखील नागरिक निष्काळजीपणाने वागताना दिसत आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन नसला तरी राज्यभरात कडक लॉकडाऊन करण्याचे नियोजन सुरू असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.


याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी करोना संदर्भात सरकारने घालून दिलेले नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या आदेशाचे पालन न केल्यास आदेशाचे उल्लंघन प्रकरणी कारवाई देखील केली जाऊ शकते, तसेच मोठा दंड देखील भरावा लागू शकतो.


हे आहेत निर्बंध 


◾रात्री ८ ते सकाळी ७ वाजे पर्यत रात्रीची जमावबंदी


◾रात्री ५ पेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास प्रत्येकी १०००/- रु. दंड 


◾सर्व सार्वजनिक आस्थापना तसेच सर्व हॉटेल, मॉल्स, प्रेक्षागृह, दुकाने रात्री ८ ते सकाळी ७ बंद राहतील. रात्री ८ नंतर, पार्सल सेवेला परवानगी असेल.


◾मास्क न घालणे रू ५००/- दंड


◾सार्वजनिक ठिकाणी थुंकणे रू १०००/- दंड


◾सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत कोव्हिड - १९ चे नियम न पाळणे रू. ५०० दंड


◾विवाहासाठी ५० ची परवानगी मात्र ५० पेक्षा अधिक लोक असल्यास संबधित मालमत्ता कोव्हिडची साथ संपेपर्यंत सीलबंद केली जाईल


◾अंत्यविधी २० ची परवानगी


◾कोणतीही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम यांना परवानगी नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा