Breakingजादूटोणा विरोधी कायदा देव किंवा धर्मा विरोधात नाही - ऍड. मनीषा महाजन


पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीमुळे सतत 18 वर्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून देखील डॉ. दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येनंतर, जादूटोणा विरोधी विधेयक 2013 मध्ये महाराष्ट्र सरकारने मंजूर केले. त्यानंतर या कायद्याअंतर्गत वर्षाला किमान सरासरी  100 भोंदू बुवा, बाबा, ताई, अम्मा, मंत्रिक यांना अटक झालेली आहे.


सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे आणि मानवलोक समाजकार्य महाविद्यालय, आंबेजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने 20 मार्च रोजीच्या वेबिनार मध्ये जादूटोणा विरोधी कायद्याचे महत्व विशद करताना ऍड. मनीषा महाजन यांनी सांगितले की, विविध धर्मातील बाबा बुवा, फादर, काजी, इतर लोक समाजातील अशिक्षित जनतेला दैवी शक्ती व अलौकिक शक्ती प्राप्त आहे आणि तुमचे दुःख, सर्व अडीअडचणी आम्ही दूर करू असे सांगत असतात. कितीतरी शतके अडाणी समाजाची आर्थिक मानसिक, लैंगिक  फसवणूक अंधश्रद्धेमुळे झालेली आहे. कायदा पारित झाल्यानंतर सुमारे 700 लोकांवर गुन्हे नोंदवले गेले आहेत असे अंनिसच्या मनीषा महाजन यांनी वेबिनार मध्ये सांगितले.


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जादूटोणा विरोधी कायदा 2013 ची विस्तृत माहिती त्या देत होत्या. आज विज्ञान आणि वैद्यकीय सेवा प्रगत आहे. मात्र साप, विंचू यावर एक भगत उपाय सांगत असेल तर ते कायद्याने गुन्हा ठरते तर या व अशा 12 गोष्टी कायद्याने गुन्हे आहेत. अशा अंधश्रद्धा मानवी विकासाला बाधक आहेत.


1. चमत्कार करण्याच्या क्षमतेचा दावा करणे आणि प्रसारित करणे आणि अशा प्रकारे लोकांना फसवणे किंवा भयभीत करणे.


2. अलौकिक शक्ती प्राप्त आहे असे सांगून एखाद्या व्यक्तीचे आयुष्य धोक्यात आणणारी किंवा गंभीर दुखापत होणारी कृती करणे किंवा प्रोत्साहित करणे.


3. गुप्तधन, मनशांती, जलस्रोत, शोधण्यासाठी अमानुष कृत्ये किंवा नरबळी, मानवी बलिदानाचे उपाय


या कायद्यातील काही कलमांचा अभ्यास केल्यास प्रगत समाजाच्या निर्मितीसाठी त्याचा फायदा होईल व असे गुन्हे कायद्याच्या तरतुदी मध्ये आहेत. प्रगत समाजाच्या निर्मितीसाठी मागील काही दशकात असे अनेक कायदे सरकारांनी संमत केलेले आहेत असे महाजन म्हणाल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा