Breakingआरोग्य सेना : सेवा आणि संघर्षाची २५ वर्षे


पुणे : 'वेदनेवर फुंकर आणि अन्यायावर प्रहार' हे ब्रीद घेऊन घोडदौड करणाऱ्या आरोग्य सेनेने सेवा आणि संघर्षाची पंचवीस वर्षांची वाटचाल पूर्ण केली. आरोग्य सेनेचा हा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन पुण्यातील आरोग्य सेना राष्ट्रीय मुख्यालयात आरोग्य सेनेच्या परंपरेनुसार अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. 


यावेळी पंचवीस वर्षांच्या कार्याचा संक्षिप्त असा १२० पानांचा अहवाल संस्थापक राष्ट्रीय प्रमुख डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. त्याचवेळी पुरोगामी जनगर्जना या आरोग्य सेनेच्या मासिकाचा मार्च महिन्याचा अंकही प्रकाशित करण्यात आला. 


यावेळी डॉ. नितीन केतकर, प्रा. डॉ. गीतांजली वैद्य, कमलेश हजारे, आशिष आजगावकर, प्रा. प्रमोद दळवी, प्रा. डॉ. प्रताप रावळ, वर्षा गुप्ते, अतुल रूणवाल, रवि चव्हाण, संतोष म्हस्के, रश्मी वैद्य,  वरदेन्द्र कट्टी, रमाकांत सोनवणी, शरद बेनुस्कर, श्रीमती भारती चव्हाण हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा