Breakingसावधान ! जुन्नर तालुक्याचा कोरोनाचा आलेख वाढताच, आज ६४ कोरोना पॉझिटिव्ह


जुन्नर : जुन्नरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तालुक्यात आज ६४ कोरोनाचे रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला. 


यामध्ये नाळावणे ८, नारायणगाव ७, तेजेवाडी ७, बारव ४, ओतुर ४, कांदली ३, आळे २, वारूळवाडी २, भोईरवाडी २, पिंपळवंडी २, राजुरी २, येणेरे २, निमदरी १, शिरोली बु. १, पिंपळगाव तर्फे ना.गाव १, उंब्रज नं.१ - १, काळवाडी १, धोलवड १, इंगळुन १, पेमदरा १, बेल्हे १, आणे १, सुलतानपुर १, जुन्नर नगर पालिका ८ समावेश आहे.


तर मागील २४ तासात पिंपळगाव आर्वी १ येथील ८२ वर्षीय एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ६ हजार ७८४ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार १६६ तर आता पर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २६४ असून सध्या तालुक्यात ३५४ ऍक्टिव कोरोना रुग्ण आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा