Breakingमोठी बातमी : १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय


मुंबई : इयत्ता दहावीची बोर्डाची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल व २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे, तसेच इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 


शिक्षण त्याच शाळेत परीक्षा


कोरोनाच्या परिस्थितीमुळे लेखी परीक्षा त्याच शाळेत अथवा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात येतील अपवादात्मक परिस्थितीमध्ये वर्गखोल्या कमी पडल्यास लगतचा शाळेमध्ये परीक्षा उपकेंद्रांमध्ये परीक्षेची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.


परीक्षेची वेळ 


दर वर्षी 80 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी 3 तास वेळ दिला जात असतो, परंतु यावर्षी विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटे वेळ वाढून वाढवून देण्यात आला आहे तर 40 व 50 गुणांच्या परीक्षेसाठी पंधरा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी वीस मिनिटे वाढवून देण्यात येणार आहे.


विशेष परीक्षेचे आयोजन 


एखाद्या विद्यार्थ्यास परीक्षा कालावधी मध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन कंटेनमेंट, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जून महिन्यामध्ये करण्यात येणार आहे. ही परीक्षा केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाचे ठिकाण निश्चित करण्यात येणार आहे.


तसेच प्रात्याक्षिक परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा