Breaking


सावधान ! जुन्नर तालुक्यातील कोरोना संख्या वाढतेय


जुन्नर (पुणे) : 3 मार्च 2021 अखेर जुन्नर तालुक्यातील कोरोनाची बाधित रुग्णांणी संख्या ६ हजार २९३ इतकी झाली आहे. उपचार होऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५ हजार ८७२ इतकी असून आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 256 इतकी आहे. तर आता एक्टीव्ह रुग्ण संख्या 162 इतकी आहे. 


तर ३ मार्च च्या आकडेवारींंनुसार नव्याने १४ कोरोना बाधितांंची भर पडली आहे. यामध्ये नारायणगाव ३, वारूळवाडी २, काळवाडी २, उब्रंज १, जुन्नर नगरपरिषद १, संतवाडी १, बोरी खुर्द १, हिवरे खुर्द १, खामंडी १, ओतून १ समावेश आहे.


हे आकडे पहाता जुन्नर तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी काजळी घेण्याचे आवहान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा