Breaking


भंडारदरा : 'सांदन व्हॅली' पर्यटनास बंदी, 'ग्रामपंचायत साम्रद'च्या वतीने लॉकडाऊन


भंडारदरा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची तीव्रता लक्षात घेत 'ग्रामपंचायत साम्रद'च्या वतीने 'सांदन व्हॅली' येथे पर्यटनास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.


सह्याद्री पर्वत रांगेतील व आशिया खंडातील दोन नंबरची 'सांदन दरी' पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक ऊन्हाळी सुट्टी मध्ये येत आसतात. मात्र, गेल्या मागील एक वर्षे पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटन बंदी आहे. काही काळासाठी पर्यटन सुरू करण्यात आले. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या ठिकाणी  ग्रामपंचायत साम्रद च्या महिला सरपंच चंद्रप्रभा मारूती बांडे यांनी पर्यटनास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.


सांदन व्हॅलीत ४ मार्च ते ९ मार्च पर्यंत पर्यटन बंदी असणार आहे. बाहेरील पर्यटकांसाठी ग्रामपंचायत क्षेत्रात बंदी असल्याचे हि पत्रकात म्हटले आहे. तसेच या कालावधीमध्ये कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा