Breakingमोठी बातमी : बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण


मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबात कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांंचा समावेश आहे. असं असतानाच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यासोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या आमिर खानलाही कोरोना झाल्याचं समोर आले आहे.


आमिर खानच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे की, “आमिर खानला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तो आता होम क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती उत्तम आहे. तसेच सर्व नियमांचं पालन करत आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करून घ्यावी,” असं आमिरच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा