Breakingमोठी बातमी : ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनात वाढ


मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर कार्यरत ग्राम रोजगारसेवक यांना अल्प मानधनवर कार्यरत होते. यासाठी महाराष्ट्र तिल 17 हजारांवर ग्रामरोजगारसेवक सातत्याने आंदोलन सुरू होते. दरमहा निश्चित मानधन द्यावे ही मागणी होती. या संदर्भात 8 मार्च 2021 रोजी  शासन निर्णय प्रमाणे 750 वर मनुष्यबळ दिवस निर्माण केल्यावर दरमहा 2000 रुपये मिळणार आहे. 1500 ते 2500 मनुष्यदिवस निर्मिती केल्यावर 3 हजार रुपये दरमहा मिळतील. ग्रामीण भागात अधिक रोजगार हमी हमीची कामे झाल्यास दरमहा 7 हजार वर मानधन मिळू शकणार आहे. या वाढीबद्दल ग्रामरोजगार सेवकांनी आनंद व्यक्त केला आहे.


मानधन आता दरमहा ग्राम रोजगारसेवक च्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. ग्राम रोजगार सेवकांच्या लढ्याला यश मिळाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा