Breakingमोठी बातमी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा ढकलली पुढे ; पुण्यात संतप्त विद्यार्थी रस्त्यावर


पुणे : एमपीएससीची (MPSC State Service Prelims) परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 14 मार्च रोजी ही परीक्षा होणार होती आता राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेच्या तारखा गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षार्थी नाराज आहेत. 


आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परिणामी अनेक जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही परीक्षा कधी होणार याबाबत लवकरच तारीख जारी केली जाईल, असेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यात म्हटले आहे.


दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थी संताप व्यक्त करत काही वेळातच पुण्यात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. परीक्षा 14 तारखेलाच घ्या अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.


विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय नेत्यांनी देखील जाण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर हे देखील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा