Breaking


अंध आदिवासी मुलास आर्थिक सहाय्य मिळावे : सुशिलकुमार पावरा


रत्नागिरी : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुुक्यामधील मोकस (नावीपाडा) येथील दोन्ही डोळे निकामी झालेल्या बिरबल बाज्‍या वसावे (वय १४) या मुलास आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी बिरसा क्रांती दलाचे कोकण विभाग प्रमुख व अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, बिरबल बाज्या वसावे या मुलाचे दोन्ही डोळे निकामी झालेले आहेत. या मुलांचे वडिलांची परिस्थिती अत्यंत गरीबीची आहे. तरी या मुलांस डोळे शस्ञक्रिया करणे, शिक्षण, संगोपन यासाठी आदिवासी विकास विभाग कडून किंवा राज्य सरकार आर्थिक मदत मिळावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा