Breakingबुलढाणा : 'एसएफआय - डीवायएफआय' तर्फे महाराष्ट्रातील शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन


बुलढाणा : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) तर्फे 23 मार्च रोजी शहिद स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्रातील शैक्षणिक समस्या आणि बेरोजगारीच्या विरोधात राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची हाक देण्यात आली होती. त्या हाकेला प्रतिसाद देत आज खामगाव येथे आंदोलन करण्यात आले. 


विद्यार्थी विरोधी नवीन शैक्षणिक कायदा रद्द करा, RTE ची अंमलबजावणी काटेकोरपणे करा, नोकरभरतीवरील बंदी उठवून ताबडतोब भरती प्रक्रिया सुरु करा, आरोग्य विभागातील भरती घोटाळा झाल्यामुळे ती परीक्षा रद्द करून नव्याने MPSC मार्फत ती परीक्षा घ्या अशा मागण्या करण्यात आले.


यावेळी एसएफआयचे जिल्हा अध्यक्ष सागर पताळे, जिल्हा सचिव ओम मुंडाले, हरिदास बगाडे, रितेश चोपड़े, महेश वाकतकर, वैभव वानखेडे, तनवीर शेख  आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा