Breakingमुख्यमंत्र्यांचा MPSC परिक्षा घेण्याचा निर्णय दुर्दैवी - आ.विनायक मेटेंकडून जाहिर निषेध
बीड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 14 मार्च रोजी होणारी स्पर्धा परिक्षा रद्द केल्यानंतर काही लोकांच्या दबावाला बळी पडून 21 मार्च रोजी परिक्षा घेण्याचे निश्चित करुन, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या मुला-मुलींचा विचार न करता त्यांचे आयुष्य उद्धवस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. असा घनाघाती आरोप शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी केला आहे.

मराठा समाजाची किंवा आमची MPSC च्या परिक्षा किंवा शासकीय नौकर भरती होवू नये अशी भूमिका मुळीच नाही. सर्व समाजाच्या मुलांना न्याय मिळावा अशीच भूमिका आमची आहे. परंतू सर्वांना न्याय देत असतांना मराठा समाजाच्या मुला-मुलींना मात्र या स्पर्धा परिक्षा व शासकीय नौकर भरतीपासून वंचित ठेवण्याचे काम करु नये आणि त्यांच्यावर अन्याय होता कामा नये ही भूमिका आमची आहे. त्यामुळेच सदरील परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात ही आमची भूमिका होती. मात्र दबावाला बळी पडत मुख्यमंत्री यांनी हा परिक्षा घेण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे आ. मेटे यांनी म्हटले आहे.

दिनांक १५ मार्च पासून मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी न्यायालयात सुरू होत असून, २५ मार्च पर्यंत ती पुर्ण होणार आहे. त्यांनतर ७ ते ८ दिवसांमध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे. म्हणजे दिनांक १ एप्रिल पर्यंत निर्णय येण्याची शक्यता आहे. असे असतांना राज्य सरकारने शासकीय नौकर भरती आणि स्पर्धा परिक्षा ५ एप्रिल नंतर घेण्यात याव्यात एवढीच आमची मापक आपेक्षा आहे.

या राज्यातील काही मंत्री, प्रशासकीय अधिकारी व नेते यांनी मराठा समाजाविरोधात शडयंत्र रचून मराठा समाजाच्या मुला-मुलींना MPSC स्पर्धा परिक्षेत स्थान मिळू नये अशी कार्यवाही सूरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून काल स्पर्धा परिक्षेच्या विरोधामध्ये मिडियाला हाताशी धरुन आंदोलन उभे केले आहे. आणि त्याचे दडपण मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आनले गेले. स्व.प्रबोधनकार ठाकरे यांचा व देशाचे कनखर नेतृत्च स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवणारे आजचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मात्र ठाम न राहता बिन कण्याचे व लवचिक निघून दबावाला बळी पडणारे मुख्यमंत्री निघाले आहेत. हे आज उभ्या महाराष्ट्राला पाहवयास मिळाले आहे, हे महाराष्ट्राल शोभणारे नाही. म्हणून आमची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना कळकळीची विनंती आहे की, MPSC ची स्पर्धा परिक्षा ही ५ एप्रिल नंतरच घेण्यात यावी, अशी मागणी आ.मेटे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा