Breakingमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना विनम्र अभिवादन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी या महान क्रांतिकारांनी बलिदान दिले आहे. त्यांची प्रेरणा घेऊन देशाच्या रक्षणासाठी आणि त्याला बलशाली करण्यासाठी सदैव सज्ज राहूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी अभिवादन प्रसंगी केले.


शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या क्रांतिकारांनी हौतात्म्य पत्करले. देशासाठी सर्वस्वाची होळी करण्याच्या त्यांच्या या समर्पण भावनेने ब्रिटिश साम्राज्य हादरले. या क्रांतिकारांनी भारतीय युवकांसमोर देश प्रेमाचे अनोखे उदाहरण ठेवले आहे. अपार त्याग आणि संघर्षातून मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आता आपल्याला, देशाला बलशाली करण्यासाठी उपयोग करावा लागेल. शहीदांनी सोपवलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मुल्यांचे जतन करावे लागेल. देशाच्या रक्षणासाठी आणि त्याला प्रगतीच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी सदैव सज्ज राहावे लागेल, हिच शहिदांना आदरांजली ठरेल. शहीद दिनानिमित्त भारत मातेच्या या तीनही क्रांतिकारी सुपुत्रांना त्रिवार अभिवादन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा