Breakingवादग्रस्त रेल्वे ठेकेदार एस.के.वल्लीचे बील रोखा अन्यथा सीटूचे उपोषण


नांदेड : वादग्रस्त रेल्वे ठेकेदार एस.के.वल्लीचे बील रोखा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा नांदेड जिल्हा मजदूर युनियन (सिटू) ने दिला आहे.


मोठ्या प्रमाणात सफाईदार कामगार दलित व अन्यायग्रस्त पिडीत असल्यामुळे डी.आर.एम.नांदेड कार्यालयापुढे गेले तेवीस दिवस व नांदेड कलेक्टर कार्यालयासमोर पाच दिवस आमरण उपोषण व धरणे आंदोलन केल्यानंतर रेल्वे ईएनएचएम आर.मंगाचार्यलू व रेल्वे ठेकेदार एस.के.वल्ली यांच्यासह इतर चार जणांवर सीटूच्या प्रयत्नातून पो.स्टे.वजिराबाद येथे अनुसूचित जाती / जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


केंद्रीय श्रम कार्यालय चंद्रपूर येथे या प्रकरण चालू असून एस.के.वल्लीला बील देण्यात येऊन नये असे श्रम कार्यालयाचे निर्देश आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात येईल व संबंधिता विरोधात ॲट्रॉसीटीसह इतर गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा युनियन अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी सांगितले.


तसेच संबंधित सहानुभूतीचा आव आणणारे व्यक्ती युनियन च्या कामगारांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करण्याऐवजी भ्रष्ट अधिकारी व ठेकेदाराला मधल्या मार्गाने सहकार्य करीत असल्याचा आरोप गंगाधर गायकवाड यांनी केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा