Breakingबा-हे पोलीस ठाणे व जनसेवा मंडळ, सुरगाणा-पेठ यांच्या वतीने कोरोना जनजागृती मोहीम !


नाशिक : सुरगाणा तालुक्यातील ग्रामीण भागातील बा-हे पोलीस ठाणे हद्दीतील गावांत बा-हे पोलीस ठाणे व जनसेवा मंडळ यांच्या मार्फ़त कोरोनाच्या दुसऱ्या लाटे संदर्भात खबरदारी उपाय योजना म्हणून जनजागृती मोहीम राबविण्यात आली.


याप्रसंगी बा-हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांनी परिसरातील तमाम जनतेस आपली व आपल्या कुटुंबाची काळजी व खबरदारी घ्यावी, असे आवहान केले. तसेच घराबाहेर पडतांना मास्क वापरा, सॅनिटायझर, हॅन्ड वॉश वापरा, साबणाने हात स्वच्छ धुवा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, सुरक्षित अंतर ठेवा व पोलीस विभागाने व आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालन करा,  अशा सूचना करण्यात आल्या.


यावेळी परिसरातील बा-हे, सर्कलपाडा, मोधळपाडा, खिरमानी, कळमने, भेगु सावरपाडा, सायळपाडा, जाहुले, हस्ते आंबुपाडा, मनखेड परिसर, गडगा, ठाणगांव परिसर या भागात जनसेवा मंडळा मार्फ़त जनजागृती व्हॅन फिरवून जनजागृती करण्यात आली.


या प्रसंगी बा-हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, पोलीस विभाग कर्मचारी तसेच जनसेवा मंडळाचे मनोहर जाधव, दिलीप महाले, नितीन भोये, कैलास चौधरी, मंगेश चौधरी, सुनील वाडू, खंडू गायकवाड, विलास महाले, प्रमोद गावित उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा