Breakingपालघर जिल्ह्यातील डी.एड. व बी.एड बेरोजगार तरुण शिक्षकांचे आ. विनोद निकोले यांना विविध मागण्यांंचे निवेदन


डहाणू : पालघर जिल्ह्यातील डी.एड. व बी.एड बेरोजगार तरुण शिक्षकांनी आज (दि. २१ मार्च) आमदार विनोद निकोले यांना विविध मागण्यांंचे निवेदन देऊन चर्चा केली.


यावेळी या सर्व शिक्षकांनी संपुर्ण पालघर जिल्ह्यात पेसा कायद्यांची कडक अमलबजावणी करा, पेसा कायद्याप्रमाणे शिक्षक भरती होण्यासाठी प्रयत्न करा, जोपर्यत पेसा कायद्याचे काटेकोर पालन होत नाही, तोपर्यंत कोणतीही नवीन भरती प्रक्रिया करण्यात येऊ नये. तसेच समायोजनाची प्रक्रिया सुद्धा थांबविण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


यावेळी डी.एड. व बी.एड बेरोजगार तरुण शिक्षकांसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य, विक्रमगड तालुका सेक्रेटरी कॉ.किरण गहला, कॉ.चंद्रकांत घोरखाना उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा