Breaking


मोठी बातमी : DYFI चे राष्ट्रीय अध्यक्ष पी.ए. मोहम्मद रियास यांना न्यायालयीन कोठडी


केरळ : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पी.ए. मोहम्मद रियास, डीवायएफआयचे माजी नेते टी. व्ही. राजेश आणि के. के. दिनेश यांना २००९ च्या एका प्रकरणात अटक केली गेली आहे आणि त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


२००९ मध्ये डीवायएफआयच्या एअर इंडियाच्या कार्यालयावर, केरळला जाणारी विमाने सतत रद्द केल्यामुळे आणि मोठ्या आर्थिक नैराश्यातून नोकरी गमावणाऱ्या परदेशी प्रवाशांना त्रास होत असल्यामुळे काढलेलल्या मार्च च्या नंतर दाखल झालेला हा खटला आहे.  


हे आंदोलन केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने परदेशी प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्याच्या निष्क्रियते विरूद्धही होते, असे ही डीवायएफआय च्या केंद्रीय कमिटीने म्हटले आहे.


डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पी.ए. मोहम्मद रियास हे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे जावई आहेत. केरळ विधानसभेची निवडणूका जाहीर झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.


कॉम्रेड मोहम्मद रियास आणि इतर दोघांना दोन आठवड्यांच्या रिमांडवर घेण्यात आले आहे. या नेत्यांची न्यायालयीन कोठडी आता तांत्रिकदृष्ट्या न्याय्यही ठरेल, परंतु ते तत्कालीन काँग्रेस सरकारचे दुर्लक्षही आता उघड करते, असे ही डीवायएफआय च्या केंद्रीय कमिटीने म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा