Breaking


धारूर : वीज जोडणीसाठी कोटेशन भरून सुध्दा शेती पिकांना पाणी मिळावा यासाठी शेतकऱ्याचे आमरण उपोषण


धारूर : धारूर तालुक्यातील गांजपुर येथील शेतकरी बाबुराव कारभारी सिरसट हे वीज जोडणीसाठी कोटेशन भरून सुद्धा वीजपुरवठा न मिळाल्याने (ता.५) धारूर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते, महावितरण कंपनीचे कार्यालय धारूरचे उपकार्यकारी अभियंता यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे.


या बाबत सविस्तर असे की, धारूर तालुक्यातील गांजपुर येथील शेतकरी बाबुराव कारभारी सिरसट यांनी शेती पिकाला पाणी देण्यासाठी वीज जोडणीसाठी कोटेशन भरलेले असताना सुध्दा विजपुरवठा न मिळाल्याने ते आमरण उपोषणास बसले होते.


धारूर येथील महावितरण कंपनीतील उपकार्यकारी अभियंता पेन्सीलवार यांनी लेखी स्वरूपात आपल्या गावात शेतीसाठी नवीन वीज पुरवठा करण्या करीता मार्च २०१८ नंतर महाराष्ट्र शासनाच्या Ag Policy २०२० मध्ये कोटेशन भरलेले आज पर्यत एकुण तीन ग्राहक असुन जेष्ठते नुसार आपला शेवटाचा क्रमांक आहे. असे लेखी आश्वासन देते वेळेस महावितरण कंपनीचे पेन्सीलवार, प्रताप निकम, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. मोहन लांब, किसान सभेचे तालुका सचिव कॉ. काशिराम सिरसट, सीटू संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. डॉ अशोक थोरात आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा