Breaking


धारूर : पं. स. चे नविन गट शिक्षणाधिकारी गणेश गिरी यांचा महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेकडुन सत्कार


धारूर : धारूर पंचायत समिती मध्ये नव्याने रुजु झालेले गट शिक्षणाधिकारी गणेश गिरी यांचा महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 


धारूर पंचायत समिती मध्ये नव्याने रुजु झालेले गट शिक्षणाधिकारी गणेश गिरी यांच्या बरोबर महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या पदाधिकारी बरोबर तालुक्यातील शालेय पोषण आहार विषयी आडी अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा करून संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी जिल्हा सचिव डॉ. अशोक थोरात, तालुका अध्यक्ष कॉ. लक्ष्मण डोंगरे, तालुका सचिव लता खेपकर, वैशाली आरसुळ, इंदुताई खेपकर, सुजाता पिंपळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा