Breaking


धुळे : बिरसा मुंडा यांचा पुतळा पुन्हा त्याच जागी आदरपूर्वक बसविण्यात यावा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली मागणी


धुळे : चंद्रपूर महानगर पालिका हद्दीतील रेल्वे स्थानका नजीक आदिवासी क्रांतिकारक क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविल्यामुळे आदिवासी समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे. हटविलेला पुतळा पुन्हा त्याच जागी आदरपूर्वक बसविण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली आहे.


चंद्रपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे आदिवासी गोंडराजाचे ही या जिल्ह्यात वास्तव होते. अनेक प्राचीन वास्तू, स्मारके या इतिहासाची साक्ष देतात. त्यामुळे चंद्रपूर शहरात आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचे स्मारक पुतळा उभारण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून आदिवासी समाजातील विविध संघटना समाजबांधवांच्या वतीने केली जात होती. अशातच चंद्रपूर प्रशासनाने बिरसा मुंडा याचा पुतळा हटवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याची होणारी विटंबना तात्काळ थांबवावे व पुन्हा आदरपूर्वक जननायक बिरसा मुंडा यांना विराजमान करावे अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर येऊन आंदोलन छेडेल, असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने दिला आहे.


या निवेदनावर धुळे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पावरा, युवा ग्रामीण धुळे जिल्हा अध्यक्ष उमेश पावरा, कार्याध्यक्ष विकास कोकणी, जिल्हा अध्यक्ष रावण ग्रुप निलेश पावरा, (अ. भा. आ. वि. प) सचिव उमर पावरा, पिंटू पावरा आदींच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा