Breakingपुन्हा लाॅकडाउन नको ! कोव्हिड काळातील आरोग्य व्यवस्था सक्षम करा; अन्यथा जनआंदोलन उभारु - माकप


किनवट : गेल्या २४ मार्च पासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सुरु झालेले लाॅकडाउन ४ एप्रिल पर्यतं सुरु आहे. पुढील काळात लाॅकडाऊन न लावता सर्व सामान्य गरीब हातावर पोट असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ येऊ देऊ नका असे निवेदन माकपच्या वतीने उपविभागीय कार्यालय किनवट येथे नायब तहसीलदार यांना देण्यात अाले. 


करोना काळात योग्य ते नियमांची अंमलबजावणी करावी आणि सोबतच कोविड काळातील आरोग्य व्यवस्था सकक्षम करावी अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली. पुन्हा लाॅकडाउन लावल्यास माकप जनतेला सोबत घेऊन जन आंदोलन उभारेल असेही निवेदनात सांगण्यात आले.


निवेदनात कोव्हिडं १९ आरोग्य व्यवस्था सोबत आणखी काही मागण्या करण्यात आल्या. यात पुन्हा लाॅकडाउन लावु नये, करोना काळात सर्व शासकीय कोविड सेंटरला आद्यावत मशिनरी ची व्यवस्था करण्यात यावी, कोविड सेंटर गोकुंदा येथील निक्रुष्ट दर्जाचे जेवानाची चोकशी करुन उत्तम भोजन द्यावे, कोविड सेटंर येथील डाॅक्टर, नर्सेस, स्टाफ यांना पि.पि.ई किट आणि कोविड संदर्भात लागणाऱ्या सर्व बाबीचा पुरवठा करावा, हातावर पोट असणाऱ्या छोटे दुकानदार, विक्रेते यांच्यावर जाचक अटी शिथील करण्यात याव्या, कोविड १९ च्या अनुशंगाने जिल्हाभरातील सर्व खाजगी रूग्णालयात रूग्णांच्या होणारी भरमसाट लुटीवर नियंत्रण आणा या मागण्या निवेदनात मार्फत करण्यात आल्या. या मागण्यांचा योग्य पाठपुरावा न झाल्यास माकपच्या वतीने जन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.


यावेळी माकपचे काॅ. जनार्दन काळे, काॅ. स्टॅलिन आडे, काॅ. नंदकुमार मोदुकवार, काॅ. शेख चाॅद, काॅ. बाबा कारपेंटर, काॅ. महेमुद पठाण, काॅ. फेरोज पठाण आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा