Breakingफ्रंटलाईन वर्कर्सना युपीएससी पूर्व परीक्षेसाठी आणखी एक संधी द्यावी, खा. अमोल कोल्हे यांची केंद्र सरकारकडे मागणीपुणे : फ्रंटलाईन वर्कर्सना युपीएससी पूर्व परीक्षेसाठी आणखी एक संधी द्यावी, अशी मागणी खा. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय राज्यमंत्री जितेन्द्र सिंह यांच्याकडे केली आहे.


पत्रात म्हटले आहे कि, कोरोना महामारीच्या सावटाखाली गतवर्षी ४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) पूर्वपरीक्षा पार पडली. या परिक्षार्थींमध्ये हजारो डॉक्टर, पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते असे कोरोना योद्धे फ्रंट लाईन वर्कर्स जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करत होते. त्यामुळे त्यांना परिक्षेची पूर्व तयारी व अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही. त्यामुळे या फ्रंटलाईन वर्कर्सना युपीएससी परीक्षेसाठी आणखी एक संधी द्यावी. 


डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे की, कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर संपूर्ण देश ठप्प झाला होता. अशा परिस्थितीत युपीएससी सीएसई परीक्षा देऊ इच्छिणारे डॉक्टर, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते फ्रंटलाईनवर कोविडच्या संकटाशी सामना करीत होते. तर दुसऱ्या बाजूला लॉकडाऊनमुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांचे क्लासेस बंद झाल्यामुळे तयारी करण्यात अडचणी आल्या होत्या. वाचन साहित्य उपलब्ध नव्हते, ग्रामीण भागातील इंटरनेटचे नेटवर्क उपलब्ध होत नसल्याने परीक्षेची तयारी करता आली नाही. या पूर्व परीक्षेसाठी मिळालेला कमी कालावधी लक्षात घेत तत्काळ भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्तिवेतन, अणुऊर्जा व अवकाश तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली असल्याचे खा. कोल्हे म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा