Breaking


पुणे जिल्ह्यातील गौरव गोंडे या खेळाडूने राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले कांस्यपदक


पुणे : पुणे जिल्ह्यातील गौरव गणेश गोंडे या खेळाडूने राष्ट्रीय स्पर्धेत क्रमांकासह कांस्यपदक पटकावले आहे. कोटा स्टेडीयम रायपूर, छत्तीसगड येथे दिनांक २४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत झाल्या होत्या. 


गौरव गोंडे याने महाराष्ट्राकडून २० वर्षाखालील वयोगटात लांब उडी या प्रकारात पदक जिंकले आहे. या यशाबद्दल गौरव याचे कौतुक केले जात आहे. गौरव संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल भोसरी येथे ट्रेक फॉर्चून स्पोर्ट्स क्लबमधील लांब उडीतील राष्ट्रीय खेळाडू गणेश गोंडे व संदीप गायखे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याला राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेजचे गणेश चव्हाण, गोपीचंद करंडे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा