Breaking


घाटघर : ग्रामपंचायत हद्दीतील पाणी पुरवठा योजनेच्या कामात दिरंगाई; आदिवासी महासंघाचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन


घाटघर (जुन्नर) : ग्रामपंचायत हद्दीतील पाणी पुरवठा योजनेच्या कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत आदिवासी महासंघाचे अध्यक्ष तुकाराम जिजाबा रावते यांनी गटविकास अधिकाऱ्यांंचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.


निवेदनामध्ये म्हटले आहे की, जल जीवन मिशन अंतर्गत गावाची नळ पाणी पुरवठ योजनेचे काम मे महिन्यात सुरु झाले पण आता पर्यत फक्त विहीर खोदून झाली आहे. टाकी पाईप, इंजिन घर नळ कनेक्शन इत्यादी कामे करणे बाकी असून संबंधित ठेकेदार व आपल्या पंचयात समितीचे संबंधित आधिकारी यांच्याकडे अनेक वेळेस फोन करुन व प्रत्यक्ष भेटून काम पुर्ण करण्याची विनंती करत आलो पण कोणत्याच प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही. 


उन्हाळ्यात पाणी टंचाई सुरु होण्यापूर्वी योजना चालू करावी. २३ मार्च पर्यंत काम केले नाही, तर ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करणार असल्याचे तुकाराम रावते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा