Breaking


स्वयंपाक घरात अच्छे दिन; घरगुती गॅस 800 रुपये, एका महिन्यात तिसरी वाढ


नवी दिल्ली : फक्त फेब्रुवारी महिन्यात घरगुती गॅसच्या किंंमती पहिल्यांदा ४ तारखेला २५ रुपयांनी, तर १५ तारखेला ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. आता किंमतीत आणखी वाढ झाल्याने एकाच महिन्यात घरगुती गॅसची किंमत १०० रुपयांनी वाढली आहे.


अनुदानित इंधन आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह सर्व श्रेणींसाठी स्वयंपाकाच्या गॅसची किंमत गुरुवारी सिलिंडरमागे २५ रुपयांनी वाढवण्यात आली. नैसर्गिक वायूच्या आंतरराष्ट्रीय किमतीमध्ये वाढ होत असताना या महिन्यात पाठोपाठ झालेली ही तिसरी दरवाढ आहे.


या वाढीमुळे, दिल्लीत १४.२ किलोग्रॅम वजनाचे सिलिंडर सध्याच्या ७६९ रुपयांऐवजी ७९४ रुपये झाली असल्याचे सरकारी इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित ग्राहकांसह सर्व श्रेणींकरता ही वाढ लागू झाली आहे.


या वाढीमुळे, दिल्लीत १४.२ किलोग्रॅम वजनाचे सिलिंडर सध्याच्या ७६९ रुपयांऐवजी ७९४ रुपये झाली असल्याचे सरकारी इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित ग्राहकांसह सर्व श्रेणींकरता ही वाढ लागू झाली आहे.


स्वयंपाकाचा गॅस एकाच दरात, बाजारभावाने देशभर उपलब्ध आहे. निवडक ग्राहकांना सरकार थोडी रक्कम अनुदान म्हणून देते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये एकापाठोपाठ झालेल्या दरवाढीमुळे महानगरे आणि मोठ्या शहरांमध्ये हे अनुदान नाहीसे झाले आहे. त्यामुळे, दिल्लीसारख्या शहरांमध्ये ग्राहकांना काहीही अनुदान मिळत नाही आणि सर्व एलपीजी ग्राहकांना बाजारभावाने ७९४ रुपये मोजावे लागतात. डिसेंबरपासूनच गॅसच्या किमती वाढत असून, तेव्हापासून सिलिंडरमागे १५० रुपयांनी वाढ झाली आहे.


देशासह राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठल्याने सर्वसामान्यांना आधीच फटका बसलेला असताना आता एलपीजी सिलिंडरच्या दरात सोमवारी प्रति सिलिंडर २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे आता १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरचा दर प्रति सिलिंडर १२५ रुपयांनी वाढला आहे.


यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी २५ रुपये दरवाढ करण्यात आली होती, त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी ५० रुपये दरवाढ करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा २५ फेब्रुवारी रोजी २५ रुपये वाढ करण्यात आली. जवळपास एका महिन्यात करण्यात आलेली ही चौथी दरवाढ आहे. दिल्लीत आता एलपीजीच्या १४.२ किलोच्या सिलिंडरचा दर ८१९ रुपये इतका झाला आहे. हवाई इंधनातही ६.५ टक्क्यांनी दरवाढ झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा