Breaking


आगीत घर जळून खाक झालेल्या कुटुंबाला ग्रामपंचायतीकडून आर्थिक मदत


श्रीरामपूर : मुठेवाडगाव (ता. श्रीरामपूर) येथील भवाळ वस्ती मधील घर जळालेल्या कुटुंबाला ग्रामपंचायतीकडून आर्थिक मदत करण्यात आली. असून याबाबत या मजूर कुटुंबाने ग्रामपंचायतीचे आभार मानले.


भवाळ वस्ती मध्ये राहत असणाऱ्या आठवले यांच्या  घराला आग लागल्यामुळे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. मुठेवाडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आठवले कुटुंबाला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच सागर मुठे, ग्रामपंचायत सदस्य गोरख जाधव, आदिनाथ दिघे, बाळासाहेब भोंडगे, दिपक मुठे, शहाराम मुठे, दिलीप मुठे, दादासाहेब मुठे, अक्षय खरात आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा