Breakingआकुर्डी येथे शहीद दिनानिमित्त क्रांतीकारकांना अभिवादन


पुणे : आकुर्डी येथे शहीद दिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी शहीद भगत सिंग, सुखदेव, राजगुरू यांनी अभिवादन करण्यात आले. यावेळी सीटूचे पुणे जिल्हा सचिव कॉ. वसंत पवार कार्यकर्त्यांशी चर्चा करताना म्हणाले की, कामगार आयुक्त अधिकाऱ्यांकडे किमान वेतन, पीएफ इ तक्रारी मांडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा युनियन तयार करत असते, याविषयी जे मूलभूत कायदे आहेत, ते आधी समजून घेतले पाहिजेत. कामगार आणि मालक यांच्यातील वाद समेट अधिकाऱ्यांमार्फत सोडवता येतो. असा आमचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.


असुरक्षित आणि विस्कळीत असलेला कामगार संघटना बांधू शकत नाही. या कामगारांचे वेतन, प्रॉव्हिडंट फंड, ईएसआय संबंधीचे वाद विवाद सोडवण्यासाठी मदत केंद्र मोलाचे काम करू शकते असेही कॉ. वसंत पवार म्हणाले.


यावेळी गणेश दराडे, ठोंबरे, सचिन देसाई, विनोद चव्हाण, शशिकांत महंगरे इ कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा