Breakingसुरगाणा महाविद्यालयातील विद्यार्थी हर्षवर्धन गावित याची राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी


सुरगाणा (दौलत चौधरी) : सुरगाणा तालुक्यातील भोरमाळ या गावातील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेला विद्यार्थी हर्षवर्धन गावित याची निवड ही 23 फेब्रुवारी रोजी पुणे येथे झालेल्या राज्य रोल बॉल स्पर्धेत त्याची निवड ही महाराष्ट्राच्या संघात झाली होती. त्यानंतर राष्ट्रीय रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने झारखंड येथे आयोजित सतराव्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने आपल्या शानदार खेळाच्या जोरावर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते. 


महाराष्ट्र संघाची अंतिम लढत ही उत्तरप्रदेश विरुद्ध खेळवली गेली होती. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यातही महाराष्ट्राच्या अष्टपैलू खेळाडू हर्षवर्धन गावित यांनी फॉरवर्ड प्लेयर म्हणून खेळतांना महाराष्ट्राच्या संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही. पाटील यांनी त्याचा सत्कार केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे सुपरवायझर प्रा.एस.एम.भोये, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुनील घुगे, कार्यालयीन अधिक्षक आर.टी. चौधरी तसेच  प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा