Breakingअखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तीन कृषी कायदे व वीज बिलांची होळी


बार्शी : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आगलावी बावी येथे दिनांक 28 मार्च 2019 वार रविवार रोजी तीन काळ्या कृषी कायद्यांची सोबतच वीज बिलांची होळी करण्यात आली.


यावेळी कॉम्रेड प्रवीण मस्तुद म्हणाले, अखिल भारतीय किसान सभेची लढाई ही वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात नसून सरकारच्या विरोधामध्ये आहे, सरकारने तातडीने शेतकऱ्यांची वीज बिले माफ केली पाहिजेत. सोबतच केंद्राचे तीन काळे कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने तातडीने  मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.


यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे लहू आगलावे, प्रवीण मस्तुद, अनिरुद्ध नखाते, पिंटू लोंढे, अण्णा उंबरे, भालचंद्र आगलावे, पवन अहिरे, सुयश शितोळे, अविराज चांदणे, भालचंद्र आगलावे, लक्ष्मण काळे, अंकुश आगलावे, प्रसाद मीठे, रवी लोंढे, रावसाहेब आगलावे, चंद्रकांत उंबरे, सुरेश लोंढे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा