Breakingइचलकरंजी : शिवाजी महाराज रिक्षा संघटनेच्या अध्यक्षपदी कॉ. जीवन कोळी यांची निवड


इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील एस. टी. स्टँड जवळील छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा संघटनेच्या अध्यक्षपदी माकपचे कार्यकर्ते कॉ. जीवन कोळी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.


या निवडीबद्दल इचलकरजीतील सर्व रिक्षा स्टॉप तर्फे स्वागत करण्यात येत आहे. तसेच त्यांचा सत्कार लाल बावटा जनरल कामगार युनियन व बांधकाम कामगार संघटना, व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉ. भरमा कांबळे यांचे हस्ते करण्यात आला. 


यावेळी बोलताना कांबळे म्हणाले की, आपली राज्य पातळीवर वाहतूक क्षेत्रात काम करणारी संघटना तयार झाली असून या निमित्ताने जिल्ह्यातील रिक्षाचालकांची भक्कम संघटना कशी तयार होईल याकडे लक्ष द्यावे आणि भविष्यात जिल्ह्यात वाहतूक संघटना बांधण्यात आघाडीवर राहावे.


यावेळी सदा मलाबादे, धनाजी जाधव, आनंदा चव्हाण, संजय टेके, नुर बेळकुडे, सुभाष कांबळे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा