Breaking


समाज प्रबोधन हवे असेल तर स्री शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही - तृप्ती जाधव


सुरगाणा (गणेश चौधरी) : ऐतिहासिक काळापासून म्हटले आहे की 'जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी' त्याचप्रमाणे एक पुरुष शिकला तर तो एकटा शहाणा होतो मात्र एक स्त्री शिकली तर ती सगळ कुटुंबा सोबतच समाजाला शहाणं करत असते.


या उक्ति प्रमाणे आदिवासी भागात समाज प्रबोधन हवे असेल तर स्री शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे प्रतिपादन नारी शक्ति जागविणाऱ्या वुई कॅन फाऊंडेशनच्या मुंबई येथील उप संचालिका कथक नृत्य विशारद सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती जाधव यांनी नुतन विद्यामंदिर सुरगाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यक्रमाप्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष आनंद खरात, नरेंद्र अहिरे, अजय बागुल, आश्विनी गावडे, किशोर पाटील, किर्ती पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी जाधव म्हणाल्या आदिवासी समाजातील महिलांना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर केवळ  चुल अन मुल सांभाळणे या पारंपरिक विचारसरणीतून स्रियांनी बाहेर पडायला हवे. त्यासाठी सावित्रीबाईनी दिलेले शिकवण आचरणात आणायला हवी. आदिवासी समाजातील महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व सक्षम आत्मनिर्भर झाल्याशिवाय समाजात ताठ मानेने वावरू शकणार नाहीत. याकरिता संस्थेच्या वतीने कुटीर उद्योग, लघुउद्योग, शेतीवर आधारित कृषी पुरक उद्योग,  महिला बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील महिलांचे आरोग्य, शिक्षण हे प्रश्न महिलांचे अधिकार, महिलांची सुरक्षा त्या कायदे विषयक मार्गदर्शन त्यांचे प्रश्न सोडविण्या करीता संस्थातर्फे प्रयत्न केले जातील.


समाजातील पिडीत वर्गाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी धडपड करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील वुई कँन फाऊंडेशने"-अँप्रोच टुवर्ड सोसायटी" तालुक्यातील आदिवासी पाड्यात आयोजित केलेला कार्यक्रम स्त्री शक्तीला जागवून गेला आहे.


फाऊंडेशनच्या विद्यमाने नुकत्याच संपन्न झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील गारमाळ, करंजाळी, तळपाडा, करवंदे, मालगव्हाण, गावित पाडा या  वस्तीतील रोजच्या कामाच्या धबडग्यात व्यस्त असलेल्या महिला एकत्र आल्या होत्या. त्यांच्या मधील अंतर्गत शक्तीची ओळख करुन देण्यात आली. या स्त्री शक्ती दर्शन कार्यक्रमात दोनशेहून अधिक  महिलांनी सहभाग घेतला. त्यांना विविध हक्क आणि कर्तव्याची माहिती देण्यात आली. कोविड विषयी माहिती देण्यात आली. उपस्थित महिलांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.


या निमित्ताने शाळेतील इयत्ता ५ ते १२ वीच्या  विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच आत्मनिर्भरतेचे धडे देण्यात आले. यावेळी 'आकाश दर्शन' हा कार्यक्रम सादर करण्यात आला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा