Breakingराज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करा - एसएफआय


मुंबई : राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) च्या वतीने करण्यात आली आहे.


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाचे कारण देऊन या वर्षीच्या राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 ही पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. 


एसएफआय ने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आधीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी प्रचंड वाढलेली असताना, राज्य सरकारचे हे पाऊल म्हणजे आगीतून फुफाट्यात अशी अवस्था आहे. या निर्णयाविरोधात सर्व विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांचा क्षोभ उसळला आहे. याची दखल आयोगाने आणि सरकारने घ्यावी, आणि हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा एसएफआय याविरोधात तीव्र आंदोलन छेडील,असा इशारा एसएफआय चे राज्याध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी दिला आहे.


एसएफआय पुढे म्हटले आहे की, राजकीय सभांचे मेळावे भरवताना विषाणू गायब होतो आणि विद्यार्थाच्या भविष्यावर नांगर फिरवायला फक्त जागा होतो, हे अजब तर्क सरकारने लावू नये. त्वरित हा निर्णय मागे घेत राज्यातील महामारी सारखी वाढणारी बेरोजगारी कमी करण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा