Breakingसंविधान सन्मानार्थ 15 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी शिक्षक प्राध्यापक नियोजनात सहभागी व्हावे - प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड


नाशिक : नाशिक शहरात संविधान सन्मानार्थ 15 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आगामी काळात कोरोनाचे सावट संपल्यावर मराठा विद्या प्रसारक संस्थेत के. टी एच एम महाविद्यालयाच्या आवारात होणार आहे. साहित्याच्या विविध प्रवाहाचा विचार समजून घेण्यासाठी 2 दिवसीय होणाऱ्या साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी प्राध्यापकांनी  नियोजनात जबाबदारी स्वीकारून भागीदारी करावी. या आधी झालेल्या साहित्य संमेलनाचा आपल्याला अनुभव आहे. त्यामुळे नक्कीच अधिक प्रमाणात चांगले नियोजन करता येईल, असे आवाहन केटीएचएमच्या प्राध्यापक बैठकीत प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी केले.


याप्रसंगी विचारमंचावर संविधान सन्मानार्थ 15 वे साहीत्य संमेलन चे मुख्य संयोजक राजू देसले, विद्रोही चळवळचे संघटक किशोर ढमाले, स्वागतद्यक्ष  शशिकांत उन्हवणे, संयोजक नितीन मते उपस्थित होते.


या प्रसंगी किशोर ढमाले यांनी विद्रोही सांस्कृतिक चळवळ ची भूमिका विशद केली. महात्मा फुले यांच्या साहित्य विषयी भूमिकेवर राज्य भर 15 साहित्य संमेलन झाली आहेत. 15 वे संविधान सन्मानार्थ विद्रोही साहित्य संमेलन नाशिक येथे ऐतिहासिक वारसा असलेल्या मविप्र संस्थेच्या प्रांगणात होणार आहे. सत्यशोधक समाजाच्या चळवळीचा वारसा असलेल्या मविप्र संस्थेत राजश्री शाहू महाराज यांनी भेट दिली होती. ह्या घटनेस 15 एप्रिल 2021 रोजी 101 वर्ष पूर्ण होत आहेत.  ह्या ऐतिहासिक घटनेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 


विद्रोही साहित्य संमेलन भारतीय संविधान, फुले, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित आहे. साहित्य संमेलनात उपस्थित असणाऱ्या साहीत्य प्रेमींना सहभागी करून घेण्यासाठी 12 विषयावर गट चर्चा करण्यात येणार आहेत. समकालीन विषयावर परिसंवाद, निमंत्रित कवी संमेलन, खुले कविसंमेलन, बालमंच, शाहिरी जलसा, चित्र प्रदर्शन, शेतकरी दिल्ली आंदोलन, संविधानावर विशेष व्याख्यान व चर्चा होणार आहे. साहित्य संमेलनची तयारी कोरोनाचे नियम पाळून सुरूच असणार आहे. 30 समित्या करण्यात आल्या आहेत. नियोजनसाठी यात आपण स्वतःच्या आवडीच्या समितीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.


राजू देसले यांनी संमेलनसाठी 1 मूठ धान्य व 1 रु मोहीम सुरू आहे. जनतेच्या पैशातून साहित्य  संमेलन व्हावे ही भूमिका आहे. जमा होणारे धान्य व निधी संमेलनासाठी वापरला जाईल. उरलेला निधी व धान्य गुरुद्वारा द्वारे दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाना मदत म्हणून पाठवला जाणार आहे. शाहू महाराज व सत्यशोधक चळवळ वारसा असलेला ठिकाणी साहित्य संमेलन व कोल्हापूरचे डॉ. आनंद पाटील जे रयत शिक्षण संस्थेच्या कमवा शिका योजनेतून शिकलेले आहेत. ते डॉ. पाटील साहित्य संमेलनाला अध्यक्ष लाभलेले आहेत. ह्या ऐतिहासिक साहित्य संमेलनात सहभागी होऊन नियोजनात मदत करावी, असे आवाहन राजू देसले यांनी केले.


बैठकीस उपप्रचार्य डॉ. पी. व्ही. कोटमे, प्रा. माधुरी मोगल, डॉ.संजय साळवे, डॉ.दिलीप पवार, आरती मंत्री, प्राची पिसोलकर, डॉ.अमोल गायकवाड, डी. एच. शिंदे,  मोहन पवार, डॉ.के.एम. आहिरे, सुवर्णा धामणे, सतीश कोटेकर व अन्य प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. दिलीप पवार यांनी आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा