Breakingजुन्नर : बेल्हे गावचे विद्यमान सरपंच राजाभाऊ गुंजाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन !


बेल्हे (जुन्नर) : बेल्हे गावचे विद्यमान सरपंच राजाभाऊ गुंजाळ (वय ५६) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 

राजाभाऊ गुंजाळ हे बेल्हे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच होते. तसेच ते पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती राहिले आहेत. एक शिवसैनिक म्हणून त्यांनी जुन्नर तालुक्यात अनेक वर्षे काम केले.

त्यांच्या निधनामुळे गुंजाळ कुटुंबियांवर आघात झाला आहे. तसेच शिवसेना एक लढाऊ कार्यकर्ता गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातून दु:ख व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा