Breakingजुन्नर : ग्रामीण भागातही होतोय कोरोनाचा शिरकाव, 'ही' आहेत कारणे


जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील कोरोनाची संख्येने दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामध्ये ग्रामीण भागातही नव्याने शिरकाव झाल्याचे दिसत आहे. प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवहान केले जात असले तरी नागरिकांची बेपर्वाई कारणीभूत ठरत आहे.


तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ६ हजार ७८४ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार १६६ तर आता पर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २६४ असून सध्या तालुक्यात ३५४ ऍक्टिव कोरोना रुग्ण आहेत.


नागरिकांची बेपर्वाई 


मास्क वापरणे, सँनिटायझर ने वारंवार हात स्वच्छ करणे, हे उपाय माहिती असतानाही नागरिक आता दुर्लक्ष करु लागले आहेत. कोरोना वाढत असताना नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत. ऐन लग्नसराईत शारीरिक अंतर पाळण्याच्या नियमांचा पुरता फज्जा उडाला आहे.


लग्नांना तुफान गर्दी, सर्व नियम धाब्यावर !


तालुक्यातील लग्नांना तुफान गर्दी होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लग्नांसाठी दिलेल्या नियमांना हरताळ फासण्याचे काम सुरु आहे. प्रशासन दक्ष असले तर लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक हस्तक्षेप करताना दिसत आहेत. त्यामुळे लग्न समारंभासाठी दिलेली व्यक्तींची मर्यादा पाळणे आवश्यक आहे.


शहरी भागातील ये - जा ही ठरते कारणीभूत ?


ग्रामीण भागातून शहरी भागाकडे आणि शहरी भागातून ग्रामीण भागात ये - जा करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. लग्न समारंभामुळे यात जास्तीची भर पडली आहे. मास्कचा वापर, सँनिटायझरचा वापर करणे काही नागरिक टाळू लागल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.


रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर !


कोरोनामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. एक वर्षभराच्या लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या आणि हाताला काम नसलेल्या नागरिक आता रोजगारासाठी शहरी भागाकडे धावताना दिसत आहेत. गावातच रोजगार निर्माण झाला असता तर हे स्थलांतर थांबले असते. परंतु रोजीरोटीसाठी होणारे स्थलांतर पुन्हा कोरोना वाढीस कारणीभूत तर ठरणार नाही ना? हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.


प्रशासनाची धडक कारवाई


प्रशासन, आणि पोलीस प्रशासन मास्क नसलेल्या नागरिकांवर कारवाई करताना दिसत आहे. मात्र तरीही नागरिक बेपर्वाईने वागताना दिसत आहे. यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


CLICK  HERE

खासदार अमोल कोल्हे यांनी संसदरत्न पुरस्कार प्रदान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा