Breaking


जुन्नर : शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन


जुन्नर (पुुणे) : वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुका समितीच्या वतीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.


प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारने संसदेत पारित केलेले तीनही शेतीविषयक कायदे शेतकरी विरोधी असून त्यातून देशातील शेतकरी उध्वस्त होणार आहेत. या कायद्याच्या विरोधात गेली चार महिने राजधानी दिल्लीच्या सरहद्दीवर शेतकऱ्यांचे अभूतपूर्व अहिंसक आंदोलन सुरू आहे. याची दखल घेण्याऐवजी हे शेतकरी आंदोलन निर्दयपणे दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकार आहे.


यावेळी केंद्र सरकारच्या दडपशाहीचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करत शेती विरोधी तीनही कायदे ताबडतोब मागे घेण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.


धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष जावेदभाई मोमीन, सचिव सागर जगताप, उपाध्यक्ष फिरोजभाई पटेल, निलम खरात, पूनम दुधवडे, महेश तपासे, संतोष डोळस, गणेश वाव्हळ व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा