Breakingजुन्नर : डॉ. सदानंद राऊत यांना 'विश्वकर्मा समाज भूषण पुरस्कार'


जुन्नर : विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महाराष्ट्र तर्फे दिला जाणार 'विश्वकर्मा समाज भूषण पुरस्कार डॉ. सदानंद राऊत यांना प्रदान करण्यात आला.


डॉ. सदानंद दगडू राऊत हे शिवनेरी भूषण पुरस्कार प्राप्त नामवंत सर्पदंश तज्ज्ञ आहेत. त्यांंची जागतिक आरोग्य संघटनेवर सर्पदंश तज्ज्ञ म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.


विश्वकर्मा वंशीय संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप दिक्षीत, पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप सुतार, जिल्हा सचिव गणेश सुर्यवंशी यांच्या हस्ते डॉ. सदानंद राऊत, डॉ. पल्लवी राऊत यांना सन्मानित करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा