Breaking


जुन्नर : सर्व धार्मिक स्थळे, कब्रस्तान, स्मशानभूमी येथे हायमॅक्स लाईट बसवा - अकीलभाई शेख


जुन्नर : शहरातील सर्व मंदिरे, मस्जिदी, दरगाह, स्मशानभूमी, कब्रस्तान येथे हायमॅक्स लाईट बसविण्यात यावेत, अशी मागणी अकीलभाई शेख यांनी जुन्नर नगर परिषदेचे नगराध्यक्ष शाम पांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

जुन्नर मध्ये अनेक सर्वधर्मीय स्थळे आणि दफनभूमी, स्मशानभूमी याठिकाणी नागरिकांना रात्रीच्या वेळे उपयोगी पडेल, या हेतूने हायमॅक्स लाईट बसविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.


निवेदन देतेवेळी मज़हर तीरंदाज, मन्नू भाई पीरजादे, जमीर ईनामदार, शरीफ इनामदार हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा