Breaking


जुन्नर : बस मध्ये चढताना अज्ञातांकडून एका वृद्ध महिलेचे मंगळसूत्र लंपास


जुन्नर : जुन्नर बस स्थानकावर जुन्नर ते अंजनावळे या बस मध्ये चढताना अज्ञातांनी एका वृद्ध महिलेचे मंगळसूत्र लांबविण्यात आल्याची घटना (ता. १ मार्च) रोजी घडली आहे.


जुन्नरहुन ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक बसला प्रचंड गर्दी असते. अनेक प्रवाश्यांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो त्यामुळे बस मध्ये बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी मोठी चढाओढ करावी लागते, याचाच फायदा घेत बस मध्ये चढताना अज्ञातांनी जबाबाई पांडुरंग साबळे (वय ६५) राहणार घाटघर यांचे मंगळसूत्र लंपास केले. या घटनेचा अधिक तपास पीएसआय सतिश घाडगे हे करत आहेत.


अधिक बातम्या वाचा :

पं. स. सदस्य काळु शेठ गागरे यांच्या उपस्थितीत पशुसंवर्धन विभागामार्फत ४५ गरीब कुटूंबांना पिल्ले वाटप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा