Breakingजुन्नर नगर परिषद तर्फे 'माझा कचरा, माझे खत' स्पर्धेचा निकाल जाहीर !


जुन्नर (पुणे) : जुन्नर नगर परिषदेने 'स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा" अभियानांतर्गत आयोजित केलेल्या 'माझा कचरा, माझे खत' या स्पर्धेत ज्योती अरुण परदेशी यांनी विजेतेपद पटकाविले. नगराध्यक्ष शाम पांडे, उपनगराध्यक्ष दिपेशसिंह परदेशी, आरोग्य सभापती सुवर्णा बनकर, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, आरोग्य निरीक्षक प्रशांत खत्री यांच्या हस्ते  बक्षीस वितरण करण्यात आले.    


"माझा कचरा माझे खत" या स्पर्धेत एकुण 11 महिलांनी सहभाग घेतला. त्यामध्ये ज्योती परदेशी यांनी प्रथम क्रमांक, छाया जोशी यांनी व्दितीय क्रमांक, कांता गायकवाड यांनी तृतीय क्रमांक, तर यशश्री जोगळेकर यांचा उत्तेजनार्थ क्रमांक पटकवला.


माझे कुटुंब माझी जबाबदारी अभीयाना अंतर्गत निबंध स्पर्धेत लहान गटा मध्ये ऋचा उंडे या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक, वृंदावनी काळे हिने व्दितीय क्रमांक  प्राची आमले हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच मोठया गटामध्ये राणी भुजबळ हिने प्रथम क्रमांक आला. चित्रकला स्पर्धेत लहान गटामध्ये साहिशा शिंदे हीने प्रथम क्रमांक, जयराम मधे याने व्दितीय क्रमांक व अर्जुन घोगरे याने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच मोठ्या गटामध्ये तेजश्री कवडे हीने प्रथम क्रमांक, तन्वी खत्री हिने व्दितीय क्रमांक व पौर्णिमा गवळी हिने तृतीय क्रमांक पटकवला.


"माझा कचरा माझे खत" या स्पर्धेमधील प्रथम विजेतीस जुन्नर नगरपरिषदे तर्फे पैठणी, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक, व्दितीय व तृतीय क्रमांकास सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक तसेच सर्व स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रके देण्यात आली. तर दिप्ती कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा