Breaking


जुन्नर : जननायक क्रांतिसूर्य धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या पुतळा सन्मानपूर्वक पुन्हा उभा करा; अन्यथा आंदोलन - आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच


जुन्नर (पुणे) : आदिवासी समाजाचं मान-सन्मान, आधारस्तंभ, महामानव क्रांतीसूर्य जननायक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे चंद्रपूर महानगर पालिकेने स्थापित पुतळ्याला हलविण्याचे कारस्थाने केल्याचे वृत्तपत्राच्या माध्यमातून समजले. महामानवाची विटंबना थांबवून पुन्हा पुतळा उभा करण्यावी अशी मागणी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे सुनिल कोरडे, नवनाथ मोरे, राहिदास बोऱ्हाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.


सविस्तर वृत असे की, महामानव क्रांतीसूर्य जननायक बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे चंद्रपूर महानगर पालिकेने स्थापित पुतळ्याला हलविले आहे. यामुळे आदिवासी समाजातून रोष व्यक्त केला जात आहे.


पुतळ्याची होणारी विटंबना तात्काळ थांबवावे व पुन्हा आदरपूर्वक जननायक बिरसा मुंडा यांना विराजमान करावे अन्यथा शांत संयमी आदिवासी समाज रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, असा इशारा आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाने दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा