Breaking


जुन्नर : नारायणगावचे स्वच्छता गृहाचे आकर्षक मॉडेल जिल्हा परिषद पुणे जिल्ह्यात राबविणार.!


लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांची सार्वजनिक शौचालय युनिट उद्घाटनप्रसंगी माहिती


नारायणगाव : ग्रामपंचायत नारायणगाव व पुणे जिल्हा परिषदच्या माध्यमातुन स्वच्छ भारत अभियान मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके व लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांच्या प्रयत्नातुन महिला सक्षमीकरण सोयीच्यादृष्टीने वार्ड नंबर १ मध्ये रोजच्या भाजी बाजारातील भाजी विक्रेत्या महिला व बाजारात येणार्‍या महिलांसाठी पुर्व वेसच्या पाठीमागे सार्वजनिक शौचालय युनिटचे उद्घाटन महिला दिनानिमित्त भाजी व्यावसायिक महिला, इनरव्हिल क्लब पदाधिकारी व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


यावेळी लोकनियुक्त सरपंच पाटे म्हणाले की, नारायणगाव ग्रामपंचायत महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे.  शिलाई मशिन प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, प्लास्टिक बंदीच्या दृष्टीने महिला कापडी पिशवीचे प्रशिक्षण यांसह विविध उपक्रम राबवल्याचे सांगितले. तर नारायणगावमध्ये तयार केलेल्या सार्वजनिक शौचालय युनिट माॅडेलचे कौतुक जिल्हा परिषदने सुद्धा केले असुन नारायणगाव ग्रामपंचायतचे हे स्वच्छता गृह माॅडेल जिल्ह्यात राबवले जाणार असल्याचे सांगितले.


महिला दिन कार्यक्रमानिमित्त उपसरपंच सारिका डेरे, अंजली खैरे, सुजाता भुजबळ यांसह भाजी बाजारातील भाजी विक्रेत्या महिलांनी मनोगत व्यक्त करत महिलांची अनेक दिवसांची मागणी पुर्ण केल्याबद्दल आभार मानत शुभेच्छा दिल्या.


दरम्यानच्या काळात इनरव्हिल क्लबच्या वतीने आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिलांना साडी, नारळ आणि फुल देऊन सन्मानित करण्यात आले.


यावेळी लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, उपसरपंच सारिका डेरे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती दिवटे, अश्विनी ताजणे,संगीता खैरे, मनीषा मेहेत्रे, आरिफ आतार, गणेश पाटे, संतोष पाटे, भाऊ मुळे, प्रविण दिवटे, हेमंत कोल्हे, मनोहर वाघ, सचिन पवार, निलेश दळवी, इनरव्हिल क्लबच्या अंजली खैरे, सुजाता भुजबळ, सविता खैरे, समृद्धी वाजगे, सुनिता कोल्हे, अश्विनी दळवी, यांसह ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई महिला कर्मचारी व भाजी बाजारातील भाजी विक्रेत्या महिला उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा