Breaking


जुन्नर : भगवान बिरसा मुंडा यांंना पुतळा हटवल्याप्रकरणी चंद्रपूर महापालिका अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा - बिरसा ब्रिगेड


जुन्नर (पुणे) : आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान धरतीआबा महामानव क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांंना पुतळा हटवल्याप्रकरणी चंद्रपूर महापालिका अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून १५ दिवसाच्या आत पुतळा पुर्नस्थापना करा, अशी मागणी बिरसा ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार जुन्नर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.


निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर रेल्वे स्थानकाजवळील बीएसएनएल कार्यालयाजवळ आदिवासी संघटना आणि समाजबांधवांच्या पुढाकाराने धरतीआबा महामानव क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा बसवण्यात आला. लोकार्पणाची तयारी चालू होती. त्याच चंद्रपूर महानगरपालिकेने हा पुतळा हटवला. या विरोधात आदिवासी समाजातून निषेध केला जात आहे.


क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांचा केंद्र शासनाच्या क्रांतिकारकांच्या यादीत समावेश असताना महापालिकामार्फत पुतळा बसविणे कर्तव्य आहे. भारत देशाला स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळविण्यात आणि इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्यामध्ये सिंंहाचा वाटा मोलाचे योगदान आहे.  


बिरसा मुंडा यांचा पुतळा हटविल्याप्रकरणी अधिकारी आणि प्रशासनाविरोधात अॅट्रोसिटी कायद्यात (scheduled tribe ascheduled castes prevention act 1989) गुन्हा दाखल करून १५ दिवसांच्या आत पुतळ्याची पुर्नस्थापना करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बिरसा ब्रिगेड च्या वतीने देण्यात आला आहे.


निवेदन देतेवेळी डॉ. विनोद केदारी, शिवाजी मडके, मंगेश आढारी, संजय भांगे, बाळासाहेब धराडे, सुदर्शन धराडे, विनोद धराडे, शुभम उंडे, सागर कोकाटे, शुभम भवारी, बाळू तुरे, रोहिदास म्हसकर, संजय मोधे, जालिंदर दुधवडे, रोहिदास मेणे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा