Breaking


कर्जत : कोबीचा भाव एक रुपया, शेतकऱ्यांने फिरवला नांगर


कर्जत : कोबीच्या एका गड्डय़ाला अवघा एक रुपयाचा भाव मिळाल्याने शेतकऱ्याने कोबीच्या उभ्या पिकावर नांगर फिरविल्याची घटना कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे घडली आहे. नाना रामचंद्र सुद्रिक असे शेतकऱ्याचे नाव आहे.


कर्जत तालुक्यामध्ये यावर्षी कोबीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र, जादा आवक झाल्यामुळे कोबीचा एक गड्डा केवळ एक रुपयाला विकला गेला. शेतातून कोबी काढून मार्पेट यार्डात नेण्याचा वाहतूक खर्चही वसूल न झाल्याने शेतकऱयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कोपर्डी येथील नाना सुद्रिक यांनी ट्रक्टरच्या साहाय्याने उभ्या पिकावर नांगर फिरविला आहे.


पुण्याच्या बाजारात कर्जतची भाजी


कर्जत तालुक्यामध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये पालेभाज्या पिकवल्या जातात. याला सर्वात मोठे मार्केट पुण्यामध्ये मिळत आहे. रोज टेम्पो भरून कर्जतहून पालेभाज्या पुणे येथे विक्रीसाठी पाठवल्या जातात.


कोरोनानंतर पालेभाज्यांचे दर कोसळलेले


कोरोनाच्या काळामध्ये पालेभाज्या चांगल्याच भाव खाऊन गेल्या. यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात पालेभाज्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. यावर्षी पाऊसदेखील चांगला पडला आहे. मात्र, दुर्दैवाने यावेळी शेतकऱ्याच्या पालेभाज्यांना भाव मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा