Breaking


कोल्हापूर : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती तर्फे क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांना अभिवादन !


कोल्हापूर : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती तर्फे क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांना 'शहीद दिनी' बिंदू चौक येथे अभिवादन करण्यात आले.


शहीदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अमर रहे, इन्कलाब जिंदाबाद आदी घोषणा देण्यात आल्या. क्रांतीगीते गाऊन शहीदांना आदरांजली वाहण्यात आली.


शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत आणि माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगता आले पाहिजे यासाठी शहीदांनी जीवनाचा त्याग केला याचे स्मरण आपण सर्वांनी ठेवले पाहिजे व त्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करुया, असा विश्वास उपस्थितींंनी व्यक्त केला.


यावेळी प्रा डॉ.उदय नारकर, प्रा.डॉ.सुभाष जाधव, भरत लाटकर, विजय भोगम, नामदेव गावडे, प्रा.टी.एस.पाटील, संभाजीराव जगदाळे, बाबुराव कदम, राजेश वरक, ईश्वरा गायकवाड, दत्तात्रय चौगुले, गणेश कोरवी, वसंतराव पाटील, व्यंकप्पा भोसले, रवी जाधव, बी.एल.बरगे, प्रा.अमृता क्षीरसागर, रमेश वडणगेकर व अन्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा