Breaking


कोल्हापूर : गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करून परंपरेला फाटा देत वडीलांचे केले उत्तरकार्य


करवीर (कोल्हापूर) : कंदलगाव ता. करवीर येथील काॅम्रेड मारूतीराव निकम यांच्या उत्तरकार्यानिमित्त निकम कुटुंबीयांनी होतकरू विध्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करून मोहन निकम, व मदन निकम यांनी फरंपरेला फाटा दिला. 


भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते कॉ. मारुतीराव निकम यांनी संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांसाठी वेचले. तरुणपणात खांद्यावर घेतलेला पक्षाचा लाल बावटा मरेपर्यंत त्यांनी खाली ठेवला नाही. आपल्या हयातीत त्यांनी अनेक संस्था, संघटना बांधल्या, अनेक सामाजिक कामे केली, कंदलगावचा तलाव अनेक वर्षे संघर्ष करून बांधला. अनेक लोकांची घरगुती भांडणे सोडवून अनेक संसार वाचवले, सुरुवातीला 26 रुपये पगार असणारा ग्रामपंचायत कर्मचारी आज किमान वेतन घेतोय, त्याला नोकरीची शाश्वती निर्माण झाली ती त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे, कॉ. मारुतीराव निकम हे फक्त बोलके सुधारक नव्हते, तर त्यांनी आयुष्यभर पक्षाचा विचार जगले. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे माजी राजाध्यक्ष तसेच नोकरी सांभाळून राजकारण व समाजकारण केलं जाऊ शकतं, हा संदेश त्यांच्या कारकिर्दीकडे बघितल्यावर मिळतो. 


खेबवडे ता. करवीर येथील खेबवडे हायस्कूल, खेबवडे या प्रशाळेतील 15 हुशार व होतकरू मुलामुलींना गणवेश वाटप करण्यात आले. हा उपक्रम दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त सातत्याने राबविण्यात येणार आहे. 


या कार्यक्रमास शिक्षक नेते दादा लाड, को.जि.मा.शि.चे संचालक जनार्धन गुरव, ईश्र्वरा वाडकर, हायस्कूल दिंडनेर्लीचे मुख्याध्यापक जे.के.पाटील, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे मार्लेश निकम, भोगावती कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय पाटील तसेच अन्य कार्यकर्ते आणि विविध ग्रामपंचायतीमधील कर्मचारी उपस्थित होते. मोहन निकम व मदन निकम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा