Breakingकोल्हापूर : इचलकरंजी वृत्तपत्रपत्रलेखक संघाची बैठक संपन्न !

इचलकरंजीवृत्तपत्र पत्रलेखक संघ इचलकरंजीची आढावा बैठक नुकतीच पार पडली. समाजवादी प्रबोधिनी येथे संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग पिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कोरोना पार्श्वभूमीवर संघटनेच्या कामकाजाची व आगामी उपक्रमाची चर्चा करण्यात आली. कोरोना कालावधीत  निधन  झालेल्या सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत संघटनेचे सचिव मनोहर जोशी यांनी केले.


पत्रलेखक अभिजित पटवा यांची दै. केसरी वर्तमानपत्र इचलकरंजी शहर व परिसर प्रतिनिधीपदी निवड झाल्याबद्दल समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस व संघटनेचे सल्लागार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते लेखणी देऊन सत्कार करण्यात आला.


सदस्य अन्वरहुसेन पटेल यांना न्युजपेपर गंगाधर साहित्य परिषद यांच्या वतीने “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक 'पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष पांडुरंग पिसे यांच्या हस्ते ग्रंथभेट देवून सत्कार करण्यात आला.


पत्रलेखक संजय रेंदाळकर यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विश्वविद्यापीठाचे सुवर्णपदक मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी पत्रलेखक संघटनेचे महेंद्र जाधव, दिपक पंडित, दिगंबर उकिरडे, रमेश सुतार उपस्थित होते. अभिजित पटवा यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा